ग्रामपंचायत आपल्या गावातील नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी नियमितपणे विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करते. रक्तदाब, मधुमेह, नेत्रतपासणी, दंततपासणी इत्यादी मोफत तपासणी शिबिरे घेण्यात येतात. मार्गदर्शन, तपासणी आणि आवश्यक औषधोपचार यामुळे नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा सहज उपलब्ध होतात.
शासकीय आरोग्य विभागाच्या सहकार्याने लसीकरण मोहिमा राबविल्या जातात. लहान मुलांचे लसीकरण, गर्भवती महिलांची तपासणी तसेच साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी विशेष मोहिमा घेतल्या जातात. लसीकरणामुळे गंभीर आजारांपासून सुरक्षितता आणि रोगप्रतिबंधक शक्ती वाढते. आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका गावागावांत फिरून जागरूकता मोहिमा राबवतात.
नागरिकांना स्वच्छताविषयक सवयी अंगीकारण्याचे मार्गदर्शनही केले जाते. आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती निरोगी व सुरक्षित राहावी, हा आमचा हेतू आहे ✅ यासाठी आपण सर्वानी आरोग्य शिबिरे आणि लसीकरण मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा ही विनंती 🙏